पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात   

पुणे : शहर परिसरातील विविध राजकिय, सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती विविध उपक्रमांनी शनिवारी साजरी केली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते  सारसबाग येथील अहिल्यादेवी यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी  शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, महेश शिंदे, संतोष नांगरे, बाबासाहेब पाटील, शंतनु जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते सारसबाग येथील अहिल्यादेवी यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महेंद्र कांबळे, विनोद शेडगे, नागेश बोबडे, हर्षद शेख, शिवानंद कवडे, शंकर बिराजदार उपस्थित होते. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने माजी अध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सुचित्रा बडगुजर, फिरोजा शेख, सारिका सोनवणे, राधिका नवले यांच्यासह कार्यकर्त्या उपस्थित होत्या. दलित सेनेच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सुनील यादव यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कॅन्टोंमेंट विधनसभा मतदार संघाच्यावतीने अध्यक्ष नरेश जाधव यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्यावतीने अध्यक्ष चेतन अग्रवाल यांच्या हस्ते पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्षा सुवर्णा भरेकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव सीएमए  डॉ. चारुशीला गायके, अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय खरे, प्रा. डॉ. सुप्रिया पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, मुकुंद पांडे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास आढाव, अधिसभा सदस्य राहुल पाखरे, रासेयोचे संचालक प्रा. डॉ. सदानंद भोसले यांच्यासह शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles